Crime NewsJalnaLatest NewsMaharashtra

जालना जिल्ह्यात धक्कादायक उघड! नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश — दोन आरोपी अटकेत

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक गोरखधंदा आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला आहे. या छाप्यात दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, अत्याधुनिक आणि पेनाच्या आकाराचे सूक्ष्म गर्भलिंग निदान उपकरण जप्त करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाला नांजा परिसरात गुप्तपणे गर्भलिंग चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पथकाने सखोल गुप्त तपास सुरू केला. तपासात गावातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपास चालत असल्याची खात्री पटली. त्यानंतर छापा टाकत केशव गावंडे आणि सतीश सोनवणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तपासात उघड झाले की अटक केलेल्या आरोपींपैकी एक पॅथॉलॉजिस्ट असून दुसऱ्या आरोपीवरही याच प्रकारच्या गुन्ह्याचा पूर्वीपासूनच इतिहास आहे. जप्त करण्यात आलेले उपकरण मोबाईल ॲपशी जोडून गर्भलिंग निदान करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक साधन असल्याचे समोर आले.

कारवाईच्या वेळी त्या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिला उपस्थित होते, म्हणजेच गर्भलिंग तपास सुरू असतानाच पथकाने धाड टाकली होती. या प्रकरणात दोन मुख्य आरोपींबरोबरच उपस्थित सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकरदन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button