गो. से. महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

खामगाव :- स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ला सकाळी दहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधान पुस्तकाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर, प्रमुख मार्गदर्शक व वक्ते ॲड. प्रशांतजी दाभाडे, प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ डी टी अढाऊ , कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. एस डी वाघ उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे प्रस्ताविक प्रा एस डी वाघ यांनी केले. सदर कार्क्रमात भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन कु.पायल मेसरे या विद्यार्थिनीने केल.कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते ॲड प्रशांत दाभाडे यांनी आपल्या भाषणातून संविधान विषयक मूलभूत अधिकार, तरतुदी, तत्वे हक्क या विषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस तळवणकर सर यांनी संविधानाचा सरनामा विद्यार्थाना समजाऊन सांगितला. शासन परिपत्रकाद्वारे “माझे संविधान माझा अभिमान” उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात दिनांक 25 नोव्हेंबर ला संविधान विषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु अंजली झाडोकार, द्वितीय क्रमांक कु समीक्षा इंगळे ,तृतीय क्रमांक कु वैष्णवी मावकार यांनी प्राप्त केले. . पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु मनीषा अल्हाट, द्वितीय क्रमांक कु .शुभांगी देवचे , तृतीय क्रमांक कु. कीर्ती ससाने यांनी प्राप्त केले.. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेते शिवनेरी गट कु.नेहा वारभुवन व कु. ऋतुजा जोशी तसेच द्वितीय क्रमांक विजेते सिंधुदुर्ग गट यश सुरवाडे व अनिकेत सपकाळ यांना मिळविला. सोबत गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव अंतर्गत गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये वर्ग 11 वी गुणानुक्रमविद्यार्थी कु. कीर्ती गुरुपवार, प्रेम शेगोकार, कु. जान्हवी इंगळे वर्ग 12 वी मधून गुणांनुक्रम विद्यार्थी कु. तृप्ती पारखे राहुल वेरूळकर, कु. श्रुती अजने यांनी प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सदर गुणवंत विद्यार्थीचे वाचन प्रा.अशोक ढाले यांनी केले.संविधान दिन कार्यक्रमाचे संचालन डॉ. अर्चना कुलकर्णी यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा. पी .डी. कायपेल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. योगेश टापरे, प्रा. आदर्श जगताप ,प्रा. धर्मराज मोगल, प्रा. श्वेता कदम, प्रा. पल्लवी खरात, प्रा.धीरज मोहिते, प्रा विनोद डाबरे, प्रा.उमेश खंदारे, प्रा. सोनाली कोल्हे, प्रा गौरी पाटील, प्रा मधुरा शिंगाडे, प्रा बाळासाहेब टकले व शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल चंदनकार, यश मोरे,संदीप वानखडे उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



