AmravatiLatest NewsLocal News

विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा लोकशाही मूल्य जतनाचा संकल्प

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आज 26 नोव्हेंबर, 2025 ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्याथ्र्यांनी वाचन करून लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्रा. किशन मोरे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी मेणबत्ती प्रज्वलन आणि संविधान उद्देशिका शिल्पाला गुलाबपुष्प अर्पण करून पूजन केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button