विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा, लोकशाही मूल्य जतनाचा संकल्प

अमरावती (दि. 26.11.2025) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आज 26 नोव्हेंबर, 2025 ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्याथ्र्यांनी वाचन करून लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्रा. किशन मोरे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी मेणबत्ती प्रज्वलन आणि संविधान उद्देशिका शिल्पाला गुलाबपुष्प अर्पण करून पूजन केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते संविधान उद्देशिका फलकाचे अनावरण
विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील संविधान उद्देशिका फलकाचे अनावरण कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, प्रा. किशन मोरे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा नाठार, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भारतीय संविधान उद्देशिकेचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. वनस्पतीशास्त्र विभागामध्ये संविधान उद्देशिकेचे फलक लावून या कार्याचा संविधान दिनी शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.



