Latest NewsMaharashtra PoliticspoliticsYavatmal

यवतमाळमध्ये शिंदेंचे विकासावर भाषण; नागरिकांना अनेक मोठी आश्वासने

यवतमाळ, २० नोव्हेंबर २०२५ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी यवतमाळमध्ये झालेल्या जाहीर सभेत विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार भाषण केले आणि नागरिकांना अनेक मोठी आश्वासने दिली. विरोधक, विकास, शेतकरी, रोजगार, MIDC आणि लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहचवण्यावर त्यांनी खुलेपणाने भूमिका मांडली.

सभेतील महत्त्वाचे मुद्दे
उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरुवातीलाच स्पष्ट केले – “मी सत्ता कुणाची आहे हे पाहत नाही… विरोधकांनाही निधी दिला. पक्षभेद बाजूला ठेवून लोकांसाठी काम करणं हेच माझं धोरण आहे.”
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकांपर्यंत पोहचवला आहे.

लाडकी बहीण योजना आणि विरोधकांवर टीका
शिंदेंनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले. “या योजनेत सर्व धर्मांच्या बहिणींना पैसे मिळत आहेत… सुरुवातीला काही अडथळे आले, पण योजना यशस्वीपणे चालू आहे,” असे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर विनोदी भाषेत टीका करत शिंदे म्हणाले – “डॉक्टर नसूनही मी छोटे-मोठे ऑपरेशन केले… 2022 मध्ये मोठं ऑपरेशन केलं, जगाने दखल घेतली. अनेकांना याचं पोटदुखी आहे, त्यांना जमालगोटा द्या.”

शेतकऱ्यांसाठी आश्वासने
शेतकऱ्यांबाबत बोलताना शिंदे म्हणाले – “शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकारी शेतकरी आहे. ओल्या कापसाला 18 टक्के ग्रेड मिळावा यासाठी प्रयत्न करू. हेक्टरी 13 क्विंटलऐवजी अधिक कापूस खरेदीचा विचार करू.”

रोजगार आणि MIDC बाबत निर्णय
यवतमाळमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी उदय सामंत यांना थेट फोन करून MIDC क्षेत्राची गरज अधोरेखित केली आणि आचारसंहितेनंतर MIDC मंजुरीचा शब्द दिला.

सभेचा समारोप
शिंदेंनी भाषणाच्या शेवटी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले – “पॅनेल निवडून द्या… 3 तारखेला मी पांढरकवडा येथे येतो. एकनाथचं वचन म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण… विकासासाठी सर्व निधी नगर विकास खात्यातून दिला जाईल.”

सभेत उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळाली आणि शिंदेंच्या विकास धोरणावर विश्वास व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button