Amaravti GraminAmravatiBuldhanaCrime NewsLatest NewsMaharashtra

मोहना खुर्द येथील गजानन महाराज मंदिरातील चोरीचा ४८ तासांत उलगडा एका आरोपीला अटक; दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील मोहना खुर्द परिसरात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून १० ते १५ हजार रुपये चोरी करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अवघ्या ४८ तासांत अटक करण्यात येऊन जानेफळ पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री घडलेल्या या चोरीनंतर मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रार प्राप्त होताच जानेफळ पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेसह संयुक्त तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच तांत्रिक पुराव्यांचा सखोल अभ्यास करून पोलिसांना एका आरोपीचा ठावठिकाणा मिळाला. या आधारे पोलिसांनी विठ्ठल रमेश बंगाळे (रा. किनी गोडमोड, जि. वाशिम) याला अटक केली.

अटकेनंतर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली Hyundai Accent कार (एम.एच. ०४ जी.एम. ३८९०) आणि २३०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या घटनेतील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे मात्र अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, या आरोपींचा नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेतील अयशस्वी चोरीप्रयत्नाशी काही संबंध आहे का, याचीही पोलीस तपासणी करत आहेत.

या कारवाईचे नेतृत्व मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे (IPS) यांनी केले असून, तपास पथकाची तत्परता आणि कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button