Amaravti GraminAmravatiLatest NewsSocial News

धामणगाव रेल्वे स्थानकावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

धामणगाव, २६ नोव्हेंबर २०२५ – धामणगाव रेल्वे स्थानकावर आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार डॉ. अर्चना अडसड रोठे, उर्फ आक्का, यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आणि पुष्पांजली अर्पण करून वीर शहीदांना विनम्र आदरांजली वाहिली.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दोन मिनिटे मौन पाळून शहीदांच्या महान त्यागाची आठवण करण्यात आली आणि त्यांच्या धैर्य आणि कर्तृत्वाचे स्मरण केले गेले.

या कार्यक्रमाद्वारे शहीदांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आदर व्यक्त करण्याचा संदेश दिला गेला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button