अमरावती मनपात संविधान दिनानिमित्त ‘उद्देशिके’चे सामूहिक वाचन!
अमरावती : अमरावती महानगरपालिकेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ११ वाजता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, मुख्य लेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, अभिलेखागार नंदकिशोर पवार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटबागे, डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. स्वाती कोवे उपस्थित होते.
महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, शहरी आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, प्रमोद मोहोड, भूषण खडेकार, शिवा फुटाणे यांसह अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान मूल्यांची जपणूक आणि अनुसरण करण्याची प्रतिज्ञा या प्रसंगी सर्वांनी केली.
यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभुषेत अभिनेता सर्जेराव गलपट उपस्थित होते.



