Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra Politicspolitics

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धारणी दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याच्या शक्यतेची माहिती; खबरदारी म्हणून नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये बसवले, कार्यक्रमानंतर सुटका

धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती दौऱ्यात काळे झेंडे दाखवू शकतात किंवा घोषणाबाजी करत निदर्शने करू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही नागरिकांना दौऱ्यादरम्यान पोलीस स्टेशनमध्ये ठेवले.

या कारवाईत कमल ठाकूर, अशोक ठाकूर, लकी मौड, सरदार यांच्यासह सहा ते सात जणांना पोलिस स्टेशनमध्ये बसवण्यात आले. मुख्यमंत्रीांचा संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला आणि कार्यक्रम संपताच सर्वांना सोडण्यात आले.

अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कमल ठाकूर यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देत सांगितले—
“आमच्या मनात कोणताही विरोध किंवा आंदोलनाचा विचार नव्हता. कोणीतरी चुकीची माहिती पोलिसांना दिली असावी. आम्ही पोलिसांच्या सूचनांचा आदर राखत संपूर्ण वेळ शांततेत पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो. बहुधा माझ्या उमेदवारीमुळे कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असावा.”

धारणी पोलिसांनी घेतलेल्या सावधगिरीच्या निर्णयामुळे कोणत्याही अनुचित प्रकारा शिवाय मुख्यमंत्रीांचा दौरा सुरळीत पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button