Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra Politicspolitics

मुख्यमंत्री फडणवीस आज धारणी दौऱ्यावर; सभेसाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा–धारणी नगरपरिषद निवडणूक प्रचाराला वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. धारणी येथे आयोजित जाहीर सभेला ते दुपारी 12 वाजता रंगभवन मैदानावर संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरात नागरिक, कार्यकर्ते आणि जनतेची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुरक्षेची व्यापक तयारी केली आहे. सभास्थळ परिसरात तपासणी नाके उभारण्यात आले असून, वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवून सुरक्षा यंत्रणांना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वपूर्ण असल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button