बाप एका पक्षात – पोरगी दुसऱ्या पक्षात!” अशोक चव्हाणांची चिखलीकरांवर थेट फटकेबाजी; लोहा राजकारण तापले

लोहा नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय ‘स्फोटक’ घटना घडली. प्रचार सभेत बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर थेट मंचावरून जोरदार टीका केली.
चव्हाण यांनी बहुपक्षीय घराणेशाहीवर निशाणा साधत वक्तव्य केले—
“लोह्याचा नवीन पॅटर्न बघा… बाप एका पक्षात, पोरगी दुसऱ्या पक्षात!”
या विधानानंतर सभेत एकच जल्लोष झाला, तर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या.
व्हिडिओ काढून दाखवण्याची चव्हाणांची मागणी
सभेत त्यांनी समर्थकांना म्हणाले—
“हा व्हिडिओ काढा… आणि त्यांना दाखवा!”
त्यामुळे चव्हाणांनी केलेला हा थेट हल्ला आता निवडणूक मोहीमेतील चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.
निवडणूक वातावरण ‘अंगारमय’
लोहा नगरपालिका निवडणुकीत आधीच चुरस निर्माण झाली होती, मात्र चव्हाणांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. समर्थक आणि स्थानिक राजकीय वर्तुळे या वक्तव्याच्या अर्थावर आता माथेफोड करताना दिसत आहेत.
एकंदर, लोह्याचे रणांगण आता अधिकच तापले असून पुढील सभांमध्ये हा मुद्दा कोणत्या स्वरूपात आकार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



