City CrimecitynewsCrime NewsMaharashtraNagpur

यशोधरा नगर : भाजप वार्डाध्यक्ष हत्याप्रकरणी पोलिसांची कडक कारवाई – आरोपीची धिंड काढून परिसरात कायद्याचा धाक

यशोधरा नगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या भाजपाच्या वार्डाध्यक्षाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण भागाला हादरवून सोडलं आहे. या घटनानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आणि पोलिस ठाण्याजवळ रास्ता रोको करून लोकांनी निषेध व्यक्त केला. वाढता तणाव आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती पाहता पोलिसांनी कठोर भूमिका घेत जलद कारवाई केली.

अटकेत असलेल्या आरोपीची हातकड्या घालून यशोधरा नगर पोलिसांनी त्याच परिसरातून धिंड काढली. आरोपीला घटनास्थळासह जवळील गल्ली-बोळांमधून फिरवण्यात आलं. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

गुन्ह्याची गंभीरता पाहता ही कारवाई आरोपींच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. स्थानिकांनी “कायद्याचा धाक कायम राहिल्यास अशा गुन्हेगारांना आळा बसेल,” अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, आरोपीवर खुनासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button