amravatinewsEducation News

ज्युनियर हॅकेथॉन-2025 : शालेय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

अमरावती, २४ नोव्हेंबर २०२५: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनियर हॅकेथॉन-2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी मार्गदर्शन, मेंटरशिप, स्टार्टअप सहाय्य आणि उद्योग स्थापनेसाठी सहाय्य प्रदान केले जाते.

ज्युनियर हॅकेथॉन-2025 हा विशेष उपक्रम ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना पोस्टर किंवा मॉडेल/प्रोटोटाईप स्वरूपात सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी टेक्नॉलॉजी अँड डिजिटल इनोव्हेशन, एन्व्हायरन्मेंट अँड सस्टेनबिलिटी, हेल्थ अँड वेलबीईंग, ओपन थीम अशा विषय ठेवल्या आहेत.

स्पर्धा दोन गटात विभागली जाईल:

  • ५ वी ते ७ वी
  • ७ वी ते १० वी

विद्यार्थ्यांनी दिलेल्या थीममधून स्वतःची संकल्पना सादर करावी लागेल. परीक्षक मंडळाकडून सादरीकरणांचे मूल्यांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित केले जातील. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेधावाटिका यांच्या एज्युकेशनल लर्निंग प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाईल.

विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button