Accident NewsAmaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावतीतील सातूर्णा MIDC परिसरात मनपा कर्मचाऱ्यावर ट्रकची धडक; संजय अंबादास राऊत यांचा मृत्यू

अमरावतीतील सातूर्णा MIDC परिसरात सोमवार सकाळी ९.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात संजय अंबादास राऊत (वय ५०, रा. खोलापुरी गेट – भातकुली रोड) यांचा मृत्यू झाला.

घटना महानगरपालिकेच्या कचरा संकलन कामादरम्यान घडली. राऊत हे पूजा कन्स्ट्रक्शन या मनपा ठेकेदाराद्वारे कचरा उचलण्याचे काम करत होते. अपघाताच्या वेळी MH 27 BX 0238 क्रमांकाचा कचरा वाहून नेणारा ट्रक परिसरात उभा होता. अचानक ट्रकने रिव्हर्स घेतल्याने मागे उभे असलेले राऊत यांना जोरदार धडक बसली.

धडक बसताच आजूबाजूला असलेले सहकारी तात्काळ राऊत यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक पोहोचले असून, राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून, पुढील तपास जारी आहे.

अमरावतीतील मनपा कर्मचाऱ्यांच्या कामात सुरक्षिततेसंबंधी प्रश्नही या घटनेनंतर पुन्हा उभे राहिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button