हॅपी स्ट्रीट्स अमरावती: फिटनेस, फन आणि सामाजिक जागरूकतेचा जबरदस्त उत्सव!

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट येथे आयोजित ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ उपक्रमाला आज नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने शहराला आरोग्य, आनंद आणि सामाजिक सहभागाचा एक वेगळाच अनुभव मिळवून दिला.
‘Sunday बनवा Funday’ या संकल्पनेनुसार सकाळी सहा वाजल्यापासूनच वाहनमुक्त रस्त्यांवर नागरिकांची उत्साहपूर्ण गर्दी उसळली.
झोननिहाय रनिंग, योगा, एरोबिक्स, तसेच झुंबा इन्स्ट्रक्टर कविता शेंडे यांच्या नेतृत्वाखालील झुंबा सत्रांनी सर्व वयोगटांमध्ये धमाकेदार ऊर्जा निर्माण केली.
लहान मुलांसाठी खेळ, मोठ्यांसाठी मनोरंजन, कुटुंबासाठी इंटरअॅक्टिव्ह अॅक्टिव्हिटीज…
मोर्शी रोड आज सकाळी एक उत्सवमय फिटनेस फेस्टिव्हल बनला होता.
शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलने स्वच्छता जनजागृती, आत्मरक्षा प्रात्यक्षिके, तसेच शिवराय–संभाजीराजेंच्या प्रेरणेवर आधारित मर्दानी खेळ सादर केले.
नागरिकांनी या प्रात्यक्षिकांचे जोरदार कौतुक करून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे अभिनंदन केले.
महानगरपालिकेने फिट इंडियाचा संदेश देत शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर दिला.
स्वच्छ सर्वेक्षण 2025 च्या दृष्टीने नागरिकांना स्वच्छता, शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व या उपक्रमातून सांगण्यात आले.
सोबतच, “हॅपी स्ट्रीट्स हा फक्त एक कार्यक्रम नसून एक सकारात्मक सामाजिक चळवळ आहे,”
असा संदेशही आज देण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख अधिकारी, माजी नगरसेविका, कलाकार, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अमरावतीने आज आरोग्यासोबतच पॉझिटिव्ह शहर संस्कृतीचा नवा अध्याय सुरू केला—हे निश्चित!



