Latest News

वरळीत नवविवाहितेची आत्महत्या; सासरी छळाचा आरोप

मुंबईतील वरळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून नवविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणीचे लग्न सुमारे नऊ महिन्यांपूर्वी झाले होते. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पतीचे इतर एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पीडितेला होता. त्यामुळे मानसिक ताण निर्माण झाल्याने तिने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पीडित तरुणी ही डॉक्टर असून मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत होती. शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button