Latest News

मुलानेच वडिलांची हत्या करून घरात पुरला मृतदेह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोटच्या मुलानेच किरकोळ कारणावरून वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील कडेठाण येथे ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव कल्याण काळे असून आरोपी मुलाचे नाव राम काळे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वडील आणि मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. वाद चिघळल्याने मुलाने धारदार हत्याराने वडिलांवर वार करून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने घरातच खड्डा खोदून मृतदेह पुरला आणि आईलाही धमकावून शांत बसण्यास भाग पाडले.

घटनेनंतर सुमारे आठ दिवसांनी घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने संशय व्यक्त झाला. मृताची पत्नीने ही बाब नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ग्रामपंचायतमार्फत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला आणि आरोपीला अटक केली. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले व नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, याच दिवशी मीरा-भाईंदर परिसरातही एका रिक्षामध्ये मृतदेह आढळल्याची दुसरी घटना घडली. पोलिसांनी गुन्हा घडल्याची शक्यता नाकारलेली नसून शवविच्छेदनाच्या अहवालावर पुढील तपास अवलंबून आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button