Latest News

परळमध्ये मुंबईतील सर्वात मोठा इनडोअर स्विमिंग पूल पुन्हा सुरू

मुंबईतील परळ परिसरात असलेला महाराष्ट्र कामगार क्रीडा भवनमधील इनडोअर स्विमिंग पूल पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. कोविड-19 काळात बंद झालेला हा पूल दुरुस्ती आणि सुधारणा पूर्ण झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु झाला.

हा स्विमिंग पूल 50 मीटर लांबीचा आणि 188.5 मीटर रुंदीचा आहे. पूलाचे खोल टोक 12 फूट तर उथळ टोक 3 फूट आहे. मुंबईतील इतर बहुतेक इनडोअर पूल 25 मीटर लांबीचे असल्याने हा शहरातील सर्वात मोठा इनडोअर पूल ठरत आहे. पूलात नवशिक्या आणि स्पर्धात्मक दोन्ही प्रकारच्या पोहणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. उथळ भागात विद्यार्थ्यांना फ्लोटेशन डिव्हाइसेसच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाते, तर स्पर्धात्मक पोहणाऱ्यांसाठी डायव्हिंग ब्लॉक्सची सुविधा आहे. फिटनेस आणि स्विमिंग प्रशिक्षणासाठी नव्याने मोठ्या प्रमाणात नोंदण्या सुरू झाल्या आहेत.

कोरोना काळात बंद असलेला हा पूल आता नव्या रूपात अपग्रेड करण्यात आला आहे. परिसराच्या मोठ्या फेसलिफ्टचा भाग म्हणून फ्लडलाइट्स, कॉर्पोरेट सदस्यांसाठी सुविधा, आर्चरी रेंज, रायफल रेंज, किकबॉक्सिंग स्पेस, लायब्ररी आणि आर्ट गॅलरी अशा नवीन सुविधा विकसित केल्या जात आहेत. सध्या सुमारे 200 सदस्य नोंदणीकृत झाले असून आधुनिक ड्रेसिंग रूमचाही समावेश करण्यात आला आहे.

महिलांसाठी देखील येथे खास गोपनीयतेची व्यवस्था असून छतामुळे बाहेरून कोणतीही अडचण निर्माण होत नाही. या सार्वजनिक पूलाचे स्थान सोयीस्कर असल्याने नागरिकांना कमी खर्चात उत्कृष्ट स्विमिंग सुविधा उपलब्ध होत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button