Latest News

नागपूर : मोबाईल न दिल्याचा राग – १३ वर्षीय विद्यार्थिनीचा धक्कादायक निर्णय

नागपूर | खापरखेडा परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने मोबाईल वापरण्यास कुटुंबीयांकडून नकार मिळाल्यानंतर टोकाचा निर्णय घेतल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली असून पोलिस तपास सुरू आहे.

घटनेतील मुलीचे नाव दिव्या सुरेश कोठारे (१३) असे आहे. दिव्या इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती मोबाईलचा अतिवापर करत असल्याचे पालकांच्या लक्षात आले होते. शिक्षणाकडे तिचे लक्ष कमी होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शुक्रवारी दिव्याच्या आत्याच्या लग्नाच्या तयारीमुळे कोठारे कुटुंबीय सर्व जण घराबाहेर होते. सायंकाळी दिव्याने नेहमीप्रमाणे मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिल्याने ती नाराज झाली. रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून थेट स्वतःच्या घरी आली.

घरी कोणी नसल्याची संधी साधून तिने पाळण्याच्या दोरीला गळफास घेतला. काही वेळानंतर तिची मोठी बहीण घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

या घटनेने मोबाईल व्यसन, पालकत्व, आणि मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button