दर्यापूरमध्ये घराणेशाहीचा स्फोट! भाजपाची उमेदवारी वादात | काँग्रेसची कडवी टक्कर

दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे.
भाजपाकडून आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी प्रकाश भारसाकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली… आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला. दर्यापूर–अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकडे तब्बल सात वेळा आमदार राहिले आहेत.
परंतु या वेळेस त्यांनी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला संधी न देता थेट पत्नीला उमेदवार केल्याने ‘घराणेशाही’ हा प्रश्न आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत आहे. यापूर्वीही, 2016 मध्ये नलिनी भारसाकडे नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या.
म्हणजे इतिहास पुन्हा रिपीट होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू.
दरम्यान, काँग्रेसने मंदाकिनी सुधाकर भाडसाकडे यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यामुळे इथे काट्याची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
दर्यापूर शहरात गेल्या पाच वर्षांत झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे, रखडलेली भूमिगत गटार योजना, आणि अजूनही न झालेला चार कोटींचा रस्ता… हे सर्व मुद्दे नागरिक आता मोठ्या आवाजात मांडताना दिसत आहेत.
नागरिकांचा सवाल एकच— “दर्यापूरमध्ये निवडणूक फक्त धनाड्य आणि घराणेशाही असणाऱ्यांचीच का? सामान्य कार्यकर्त्याला आणि सामान्य नागरिकाला संधी कधी?” या निर्णयामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे सूर उठू लागले आहेत.
आता प्रश्न एक—
प्रकाश भारसाकडे सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक कशी जिंकणार?
आणि जनता घराणेशाही स्वीकारणार की बदलाचा मार्ग निवडणार?
दर्यापूरचा निकाल यावेळी संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण बदलू शकतो.



