Latest News

अजिंठा लेणीजवळ पुणे येथील महिला पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, जिथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात, तिथे आज एक दुःखद घटना घडली. पुणे येथील योगिता महेश सावंत या त्यांच्या कुटुंबासोबत अजिंठा लेणी पाहण्यासाठी आल्या होत्या.
लेणीच्या पायऱ्या चढून गेल्यावर, त्या लेणी क्रमांक एकच्या जवळ जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यासोबत त्यांचे पती महेश राजाराम सावंत आणि त्यांची दोन मुली व एक मुलगा असे कुटुंबातील सदस्य होते.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी धावपळ सुरू झाली. रुग्णवाहिका चालक अमर जाधव यांनी फर्दापूर येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून श्रीमती सावंत यांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या दरम्यान, कर्तव्यदक्ष पोलीस भरत कोळी यांनीही तत्परता दाखवत महिला पर्यटकास त्यांच्या कारमधून लेणीमधून टी-पॉईंटपर्यंत आणण्यासाठी मदत केली.परंतु, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रीमती योगिता सावंत यांना तपासले आणि त्यांना मृत घोषित केले.या दुःखद घटनेनंतर, लेणी परिसरात आपत्कालीन स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button