पुसद नगर परिषद निवडणुकीत व्हायरल व्हिडिओची खळबळ; भाजप नेते निलय नाईकांची प्रतिक्रिया

पुसद नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये भाजपाचे निलय नाईक कथितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोहिनी नाईक यांना मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओच्या प्रसारानंतर स्थानिक राजकारणात चर्चा चांगलीच तापल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी आमदार निलय नाईक नाईक यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या व्हिडिओतील दावे फेटाळून लावत तो दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले. मतदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट ऑडिओ जोडून व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
नाईक यांनी तसेच, निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत मतदारांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
या व्हायरल व्हिडिओने निवडणूक प्रचाराला नवे वळण लागले असून या प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडिया आणि स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच सुरू आहे.



