शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेशिराळा येथे कृषी मेळावा आणि उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा

भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी कष्ट आणि प्रामाणिकपणे शेती करून देशाचे पोट भरत आहेत. मात्र निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, शासन त्यांच्यासोबत खंबीर उभे आहे, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिराळा येथे व्यक्त केला.
स्व. विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध प्रतिष्ठानतर्फे शिराळा येथील कस्तुराबाई जैन विद्यालय प्रांगणात कृषी मेळावा आणि उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार-2025 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण करण्यात आले.
शेतकऱ्यांना मोठे सवलती आणि मदतीची हमी
कृषी मंत्री भरणे म्हणाले की,
- 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे,
- अमरावती जिल्ह्यासाठी 518 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर,
- पात्र शेतकऱ्यांना सर्व लाभ लवकरच उपलब्ध करून दिले जातील,
- प्रशासन शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान
मेळाव्यात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. कृषी क्षेत्रातील विविध कीडनाशके, फवारणी यंत्रे, कृषी अवजारे यांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



