यावली शहीद ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम—घरपट्टी भरण्यासाठी जनजागृती रॅली; राज्यभरात चर्चेचा विषय

अमरावती/यावली शहीद – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमी यावली शहीद गावात थकीत घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने राबवलेला अभिनव उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. गावकरी, पदाधिकारी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीने संपूर्ण गाव उत्साहात दुमदुमून गेले.
वेशभूषेमुळे आकर्षण वाढले
रॅलीत एक व्यक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वरूपात तर दिव्यांग बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे या जनआंदोलनाला सामाजिक एकात्मता आणि आध्यात्मिक प्रेरणेची वेगळी छटा मिळाली.
रॅलीदरम्यान घोषणांच्या माध्यमातून गावकऱ्यांना संदेश देण्यात आला—
“थकीत कर भरा, घरकुल नियमित ठेवा आणि गावाचा विकास वेगाने पुढे न्या!”
शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
घरपट्टीवरील शासनाच्या सवलतीच्या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून
- थकीत करदारांनी त्वरित लाभ घ्यावा
- दंड, व्याज आणि कारवाईची टाळाटाळ होऊ नये
असा संदेश दिला गेला.
ग्रामपंचायतीचा पुढाकार
या उपक्रमात
- सरपंच शिल्पा तुषार खवले
- उपसरपंच
- ग्रामसेवक
- ग्रामपंचायत सदस्य
- माजी सरपंच
- सामाजिक कार्यकर्ते
- मोठ्या संख्येने ग्रामस्थ
उपस्थित होते.
राज्यातील पहिला घरपट्टी जनजागृती उपक्रम
राष्ट्रसंतांच्या ‘गावगाडा’ तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात उतरवत यावली शहीद ग्रामपंचायतीचा हा उपक्रम राज्यातील पहिला घरपट्टी जागृती आंदोलन म्हणून ओळख मिळवत आहे. गावाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सरपंच शिल्पा तुषार खवले म्हणाल्या —
“गावकऱ्यांनी घरपट्टी नियमित भरल्यास गावाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने शक्य होईल. यासाठीच जनजागृती रॅलीद्वारे नागरिकांना प्रोत्साहन देत आहोत.”



