Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात व्यावसायिकांना 48 कोटींचे कर्जवाटप

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे उद्योजक आणि व्यावसायिकांना आवश्यक भांडवली मदत मिळावी यासाठी आज विशेष कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दस्तूरनगर येथील एमआयडीसी असोसिएशन हॉलमध्ये पार पडलेल्या MSME क्रेडिट आउटरीच कॅम्पमध्ये एकूण 48 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर होते. यावेळी सेंट्रल बँक झोनल ऑफिस पुणेचे सहायक महाप्रबंधक नयनकुमार सिन्हा, अभिनंदन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे, तसेच सेंट्रल बँक अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय उपस्थित होते.

या उपक्रमाचे कौतुक करताना किरण पातूरकर म्हणाले की,
“व्यावसायिकांच्या गरजा आणि शंकांचे निरसन एकाच ठिकाणी होण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरला आहे. येत्या काळात अधिकाधिक उद्योजक कर्ज घेण्यासाठी पुढे येतील. बँकेच्या सहकार्यामुळे उद्योगांना चालना मिळेल.”

मेळाव्यात नयनकुमार सिन्हा, शिवाजी देठे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. सेंट्रल बँकेचे मुख्य प्रबंधक दीपक दाभोले यांनी बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पांडेय यांनी केले, सूत्रसंचालन निलेश मुंढेकर यांनी, तर आभार अक्षय वैष्णव यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button