Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

तीन वर्षीय प्रज्ञा अत्याचार प्रकरणाविरोधात अमरावतीत निषेध – मेणबत्ती प्रज्वलन करून श्रद्धांजली

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय प्रज्ञावर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध म्हणून अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने राजकमल चौकात मेणबत्ती प्रज्वलन करून कुमारी प्रज्ञाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या अमानवी कृत्याबद्दल आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

शोक आणि निषेध सभेला युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button