Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपत्र उपलब्ध; 13 डिसेंबरला परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय, अमरावतीच्या शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली असून परीक्षार्थी ती www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून नि:शुल्क डाउनलोड करू शकतात.
प्रवेश परीक्षा शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण 61 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



