Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

चांदुरबाजारच्या बोर्डीनाला तलावावर मच्छिमार सहकारी संस्थांना नोंदणीचे आवाहन

चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्पाचा 152.27 हेक्टर क्षेत्रफळाचा तलाव पाटबंधारे आणि जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. तलावाचे क्षेत्रफळ 500 हेक्टरखाली असल्याने, येथे मत्स्यव्यवसायासाठी सहकारी संस्था नोंदणी अनिवार्य आहे.

यामुळे तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मच्छिमार महिलांना सहकारी संस्थेद्वारे या जलाशयाचा उपयोग करून मत्स्यव्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.

यासाठी नोंदणी करण्यास इच्छुकांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संस्था नोंदणीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती यांच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button