AmravatiLatest News

विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी

कुलगुरूंनी दिली राष्ट्रीय एकात्मता दिवसाची उपस्थितांना शपथ

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले व उपस्थितांना एकात्मता दिवसाची प्रतिज्ञा दिली. जयंती कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, न.न.सा. संचालक डॉ. अजय लाड, एल.एल.ई. संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, डॉ. दादाराव चव्हाण, श्री. ऋतुराज दशमुखे, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, सहा. कुलसचिव डॉ. विरेंद्र निमजे, श्री अनिल मेश्राम तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button