citynewsLatest NewsNanded

मुदखेड तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत; शेळीचा बळी

नांदेडच्या मुदखेड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. शिखाची वाडी शिवारात बिबट्याने एका शेतकऱ्याच्या आखाड्यावर बांधलेली पाळीव शेळी फस्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दिगंबर अंबादास खानसोळे यांनी त्यांच्या आखाड्यावर एक शेळी बांधली होती. मध्यरात्री अचानक आलेल्या बिबट्याने शेळीवर झडप घालत तिला ठार केले. ही घटना पहाटे उघडकीस आली.

याआधीही लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे हा बिबट्या ग्रामीण भागात मुक्तपणे फिरत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर हे प्रशासन आणि वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत असून, शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button