citynewsCrime NewsLatest News

मानकापुरात पिता-मुलीवर जीवघेणा हल्ला, दोघांचीही प्रकृती गंभीर

मानकापुर परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. घरातील बाथरूममध्ये एका वडिलांनी स्वतःच्या 16 वर्षीय मुलीवर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. हल्ल्यानंतर आरोपीनेही विषारी पदार्थ सेवन केला. सध्या दोघांचीही प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्लू तिवारी असे आरोपीचे नाव असून गुरुवारी दुपारच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये त्यांनी मुलीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत तिचा तातडीने रुग्णालयात हलवण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपीनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांच्या मते, कल्लू तिवारी हे काही काळापासून मानसिक तणावात होते आणि त्यांना संशयाचा मनोविकार असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीविरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे मानकापुर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button