AmravatiLatest News

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मूल्यांकनातसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला तृतीय स्थान

कुलगुरुंच्या हस्ते आस्थापना विभागातील कर्मचा-यांचा सत्कार


अमरावती :
 महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र व शिक्षण विभागाने सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत शासकीय अकृषी विद्यापीठांमध्ये राबविलेल्या मूल्यांकनात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला 62 गुणांसह तृतीय स्थान मिळाले आहे. या यशाबद्दल विद्यापीठाच्या आस्थापना विभागातील कर्मचा-यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सत्कार केला. अतिशय कमी मनुष्यबळातही आपल्याला हे यश प्राप्त करता आले, हे अतिशय अभिमानास्पद असून करण्यात आलेल्या मूल्यांकनात आपले विद्यापीठ राज्यात तृतीय स्थान प्राप्त करु शकले, ते आस्थापना विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळेच शक्य झाले आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठाने 68 गुणांकनासह प्रथम स्थान, तर मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी 66 गुणांसह व्दितीय स्थान पटकाविले आहे.
               उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील तेरा सार्वजनिक अकृषी विद्यापीठांच्या कामकाजाची तपासणी केली. या उपक्रमात विभागाने विविध निकषांच्या आधारे विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून कोणतेही अर्ज किंवा माहिती मागविल्या गेली नाही. सरकारकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे सन 2024-25 या शैक्षणिक सत्रातील कामकाजाचे अन्स्र्ट अॅन्ड यंग कंपनीची मदत घेवून सदर मूल्यमापन केले गेले.
                कामकाजाचा आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्ती, सरळसेवा नियुक्ती, रिक्त पद स्थिती,  बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आय.जी.ओ.टी. पोर्टलवर नोंदणी आणि पाच अभ्यासक्रम पूर्ण करणे तसेच सर्व कर्मचा-यांचे सेवापुस्तक अद्ययावत व डिजिटल करणे असे निकष मूल्यांकनासाठी निश्चित करण्यात आले होते. या सर्व निकषांचे मिळून शंभर गुण ठेवण्यात आले होते.
                 या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव श्री अनिल मेश्राम, अधीक्षक श्री अमोल म्हैसाळकर, वरिष्ठ सहाय्यक श्री अजय देशमुख, डॉ. श्रीकांत तायडे, श्री जगदीश देशपांडे, श्री नरेंद्र खैरे, श्री प्रदिप चिमोटे, श्री प्रशांत देशमुख, आदिती मोहोड, श्री अनंत पाटील, श्री आशीष माहोरे, श्री राम पासरे, श्री संदीप ताथोडे, श्री साहील क्षीरसागर, श्री चंद्रकांत धंदर, श्री दिनेश मारोडकर, श्री रामे·ार सोळंके, बिहारीलाल जयस्वाल, वंदना गुरनुले आदी कर्मचा-यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button