Amravati

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 20.11.2025) : एल.एन.सी.टी. युनिव्र्हसिटी, भोपाल येथे 10 ते 14 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलिबॉल (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा प्रणय बोरकर, सार्थक तारे व सोहेल शाह, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा धनराज अखंडे व शिवम धिकार, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा आदित्य भारती, पल्लबज्योती नाथ, हर्ष कुमार व ऋषिकेश प्रसाद,श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाचा दिपेश सोलंकी, हर्ष बुंदेले व प्रेम इंगळे, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा प्रज्वल शेंडे व रोहण मेश्राम, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतचा रिजवान उल्लाह खान व प्रतिक परतकार यांचा समावेश आहे.
                चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 28 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर दरम्यान होणार आहे. निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button