citynewsDhuleLatest NewsMaharashtra

धुळे जिल्ह्यात १० क्विंटल प्रतिबंधित गोमांस जप्त; गो-रक्षक व पोलिसांची संयुक्त कारवाई

धुळे जिल्ह्यात गोमांस तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, तब्बल १० क्विंटल प्रतिबंधित गोमांस जप्त करण्यात आले आहे. गो-रक्षक पथक आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त रित्या ही कारवाई केली. संशयित टेम्पोचा पाठलाग करून ही खेप ताब्यात घेण्यात आली. टेम्पोमध्ये खास बनावट लोखंडी खोकी तयार करून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरक्षक विनोद पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खरजाई नाका परिसरात संशयित टेम्पो दिसला. संशय वाढल्याने पथकाने पाठलाग सुरू केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकाने एका वाहनाला धडक दिली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ धुळे तालुका पोलिसांनी हस्तक्षेप करून टेम्पो ताब्यात घेतला.

तपासादरम्यान लोखंडी ब्रीफकेससारखी खोकी आढळून आली, ज्यामध्ये तुकडे, पाय, डोकी यांसह एकूण १० क्विंटल प्रतिबंधित गोमांस आढळले. या प्रकरणी महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे गोमांस कुठून आणले होते? वाहतूक कोणत्या नेटवर्कद्वारे केली जात होती? आणखी कोण सामील आहे? या सर्व बाबींचा धुळे तालुका पोलीस सखोल तपास करत आहेत. धुळ्यातील ही कारवाई अलीकडील काळातील सर्वात मोठी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button