Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

चिखलदरा नगरपरिषद निवडणूक : भाजपचा ‘क्लीन स्वीप’, अल्हाद कलोती बिनविरोध विजयी

चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय ड्रामा अखेर संपला असून भाजपने विजयी झेंडा फडकावला आहे. भाजपचे उमेदवार अल्हाद कलोती हे सर्व प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडून आले आहेत. या निकालाला आमदार रवी राणा यांच्या राजकीय प्रयत्नांचे यश मानले जात आहे.


स्पर्धकांनी मागे घेतले अर्ज

निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद तसेच नथ्थू खडके गटाचे नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अल्हाद कलोती यांना सरळ विजयाचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडींमुळे चिखलदरा नगरपरिषदेत ऐतिहासिक स्थिती निर्माण झाली आहे.


फडणवीसांचा थेट फोन, रवी राणा यांना शुभेच्छा

बिनविरोध विजयानंतर

  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनद्वारे आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या.

अल्हाद कलोती हे फडणवीस यांचे बंधू असून, त्यांच्या राजकीय वाटचालीला मोठा बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.


भाजपला मोठा राजकीय टप्पा

प्रतिस्पर्धी पक्षांनी माघार घेतल्याच्या निर्णयामुळे

  • चिखलदरा नगरपरिषदेवर भाजप व राणा–फडणवीस गटाने मोठी राजकीय मजल मारली असल्याचे मानले जात आहे.

चिखलदरा निवडणुकीतील हा निकाल स्थानिक राजकारणात दीर्घकालीन परिणाम घडवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button