Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती | धक्कादायक घटना – वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अग्निशमन कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती महानगरपालिका अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 20 नोव्हेंबर रोजी समोर आली. बडनेरा झोनमध्ये कार्यरत असलेल्या राजेश वासुदेव मोहन यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास कीटकनाशक औषध प्राशन केले.

घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच काळापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजेश मोहन यांना मानसिक त्रास दिला जात होता. अखेर हा त्रास सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत अग्निशमन केंद्र प्रमुख केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “कर्मचारी मोहन यांच्या मागणीनुसारच त्यांची बदली बडनेरा झोनमध्ये करण्यात आली होती. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे कारण काय आहे, याची माहिती घेत आहोत.”

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेनंतर मनपा अग्निशमन विभागात खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button