Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावती | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

अमरावती जिल्ह्यात नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती अविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यशोमती ठाकूर यांनी आरोप केला की,
कलोती यांचा पराभव झाला असता तर तो मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असता आणि म्हणूनच निवडणूक प्रक्रियेत दबाव, गैरप्रकार व धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकूर यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून उमेदवारांना धमक्या दिल्या आणि आर्थिक प्रलोभने देण्यात आली,” असा त्याचा दावा आहे.

त्यांनी आणखी आरोप करत म्हटले की अमरावती शहरातील काही जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठीही राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी ठाकूर यांनी भाजपा नेतृत्वावरही टीका केली. प्रदेशात संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून “या प्रकारामुळे मुख्यमंत्री इतिहासात कठोर प्रतिमा असलेले म्हणून ओळखले जातील,” असे त्यांनी वक्तव्य केले.

यशोमती ठाकूर यांनी पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही टीका करत “भाजपमध्ये मूळ कार्यकर्ते कमी आणि बाहेरून आलेले लोक जास्त आहेत,” असा दावा केला.

तसेच, अमरावतीतील राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी “भाजपची राजकीय दिशा रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या प्रभावाखाली गेली आहे,” असे मत व्यक्त केले.

दरम्यान, भाजप किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button