citynewsLatest NewsYavatmal

यवतमाळ नगर परिषद निवडणूक : माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी उमेदवारीतून बाद, उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

यवतमाळ नगर परिषद निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या उमेदवारीला उच्च न्यायालयाने धक्का देत याचिका फेटाळली, ज्यामुळे त्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून औपचारिकरित्या बाहेर पडल्या आहेत.

मडावी यांनी मतदार यादीत नाव नसल्याचा मुद्दा आव्हान देत न्यायालयाची दारं ठोठावली होती. पण सुनावणीदरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) दिलेल्या महत्त्वाच्या निवेदनात स्पष्ट झाले की कट-ऑफ डेटपूर्वी माधुरी मडावी यांचे नाव मतदार यादीत नव्हते, त्यामुळे त्यांची याचिका ग्राह्य धरता आली नाही.

न्यायालयाच्या निर्णयाने यवतमाळमधील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. आता काँग्रेसकडून प्रियंका जितेंद्र मोघे या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे.

या निर्णयानंतर यवतमाळ नगर परिषद निवडणुकीची लढत आणखी रोचक बनली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button