citynewsLatest NewsNagpurNagpur gramin

भांडेवाडीतील निवासी इमारतीत बिबट्याची एन्ट्री; परिसरात भीतीचे वातावरण

नागपूर – शहरातील भांडेवाडी परिसरात शनिवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथील एका आवासीय इमारतीत चक्क एक बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. बिबट्या सध्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

घटनास्थळी वन विभाग, पोलिस दल आणि ‘हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूर’ यांच्या टीमने तातडीने धाव घेतली असून बिबट्याला tranquilize करून सुरक्षितरीत्या पकडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

स्थानिकांनी इमारतीत बिबट्या शिरल्याचे दृश्य पाहताच मोठी गर्दी केली. तत्काल संघटनेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची खातरजमा केली आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्याचे वन्यजीव वॉर्डन अजिंक्य भटकर व TTC सेंटर यांना माहिती देण्यात आली.

सध्या संपूर्ण इमारतीला वेढा घालून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या घाबरल्यास हल्ला करू शकतो, त्यामुळे कोणतीही धाडसी कृती किंवा जवळ जाणे टाळण्याचे आवाहन जोरदार करण्यात येत आहे.

परिस्थितीवर वन विभाग, पोलिस आणि बचाव पथक पूर्ण दक्षतेने काम करत असून पुढील काही तासांत बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button