citynewsLatest News

नागपूरमध्ये ‘ऑपरेशन थंडर’ची मोठी कारवाई; १.७१ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू माल जप्त, एक जण अटक

शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. मादक पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत प्रतापनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. खामला येथील सिंधी कॉलनीमध्ये छापा टाकून अवैध सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा १,७१,९३८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून अनिल सदोरमल चावला (वय ५४) याला अटक करण्यात आली आहे.

शहनिशा करून छापा
१७ नोव्हेंबर रोजी प्रतापनगर पोलीस पथक गस्तीदरम्यान कार्यरत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्लॉट नं. १८५, सिंधी कॉलनी, खामला येथे छापा टाकण्यात आला. पंचासमोर झालेल्या तपासणीत घरात विविध कंपनींचा आणि अनेक फ्लेवर्सचा तंबाखू व गुटखा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळला.

आर्थिक फायद्यासाठी धंदा कबूल
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा अवैध व्यवसाय आर्थिक फायद्यासाठी केल्याचे कबूल केले. तसेच पत्नी सौ. मुजु अनिल चावला (वय ५०) हिच्यासह संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याचा खुलासाही झाला. या दोघांविरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कमिश्नरांच्या आदेशानुसार मोहीम
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button