City CrimecitynewsNanded

नांदेड – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू; मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड तालुक्यातील पांगरी येथे राहत असलेल्या शीतल मोरे ही अभ्यासासाठी तिच्या मित्राच्या खोलीवर गेली होती. मात्र त्याच खोलीत तिने गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि विविध संघटना रात्री उशिरा पोलिस ठाण्यात जमा झाल्या व आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनास्थळी संशयास्पद परिस्थिती पाहता तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकरण गंभीर असल्याने शीतल मोरेचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टम करण्यात आला आहे.

या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button