Amaravti GraminAmravatiamravatinewscitynews

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक

रुग्णालय परिसरात घाणीचा सुळसुळाट, रुग्ण व नातेवाईक त्रस्त

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि प्रशस्त मानले जाणारे जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या दुर्व्यवस्थेच्या कचाट्यात सापडले आहे. रुग्णालयातील परिस्थिती अक्षरशः जैसे थे असल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे.

सकाळच्या स्वच्छतेनंतर पुन्हा घाणीचे साम्राज्य
रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी दररोज सकाळी वॉर्डांमध्ये नियमित साफसफाई करतात. मात्र काही तास जात नाहीत तोच रुग्णालयाच्या विवीध भागात पुन्हा कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरलेली दिसते. या अस्वच्छ वातावरणामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

रुग्ण-नातेवाईक नाराज — प्रशासन बेफिकीर?
उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी अशी अस्वच्छता धोकादायक ठरत आहे. रुग्णालयात पाय ठेवताच येथील गलिच्छ परिस्थिती पाहून अनेक नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांचा सवाल एकच —
“रुग्णालय प्रशासन नेमके काय करत आहे आणि जबाबदार कोण?”

अनेक तक्रारी समोर येत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही. परिणामी, स्वच्छतेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे.

रुग्णालयातील स्वच्छता व व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे लक्ष केव्हा वळणार, याची उत्तरदायित्वाची वाट पाहत रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button