Latest News
पश्चिम बंगालमध्ये ३४ लाख आधारकार्ड धारक मृत घोषित, UIDAI ने EC ला दिली माहिती

पश्चिम बंगालमध्ये ३४ लाख आधारकार्ड धारकांना मृत घोषित करण्यात आले आहे, असे यूआयडीएआय (UIDAI) अधिकार्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाला (ECI) माहिती दिली. या आकडेवारीत जानेवारी २००९ पासून आधार कार्ड सुरू झाल्यापासून मृत घोषित झालेले लोक समाविष्ट आहेत.
UIDAI ने निवडणूक आयोगाला हे देखील सांगितले की, राज्यात सुमारे १३ लाख लोकांकडे कधीही आधार कार्ड नव्हते, पण ते आता मृत आहेत.
ही माहिती राज्यातील मतदार यादीची शुद्धता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे.



