International NewsLatest News

तुर्कीने इस्रायलचे पंतप्रधान नेतेन्याहूविरुद्ध नरसंहाराचा अटक वॉरंट जारी केला

तुर्कीने गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या “नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या अपराधां”साठी इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतेन्याहू आणि त्यांच्या सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. तुर्की सरकारने सांगितले की, गाझामध्ये इस्रायलने हे अपराध सिस्टिमॅटिक पद्धतीने केले असून, त्याची जबाबदारी थेट नेतेन्याहू यांच्यावर येते.

या निर्णयानंतर इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडीयन सार यांनी म्हटले, “आम्ही हे आरोप पूर्णपणे नाकारतो आणि त्यांचा कठोर शब्दांत निषेध करतो. हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांचा आणखी एक राजकीय प्रचाराचा प्रयत्न आहे.”

या निर्णयामुळे तुर्की-इस्रायल संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button