Latest NewsMaharashtra

वालसावंगी गावात “वंदे मातरम्” कार्यक्रमाने दुमदुमले वातावरण

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात माळी समाज मंगल कार्यालयात आज “वंदे मातरम्” हा देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्वांनी एकत्र येत सानुदायिक स्वरूपात “वंदे मातरम्” चे गायन केले आणि देशभक्तीचा नाद सभागृहात गुंजला. या कार्यक्रमाचे आयोजन पिपळगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष गणेश भिकाजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी सभापती लक्ष्मण मामा मळेकर, प्रकाश पवार, अजिंक्य वाघ, दिनेश कोथलकर, किरणराजे कोथलकर, गणेश गाडेकर, रमेश पाटील तराळ, बालू आहेर, दिनेश देवकर तसेच पत्रकार विशाल अस्वार, मुस्तफा पठाण आणि राजू शहा उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वांनी “वंदे मातरम्” च्या जयघोषाने सभागृह दुमदुमवले. या कार्यक्रमातून एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा संदेश दिला गेला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button