Latest NewsMaharashtra

वंदे मातरम्’चा १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभक्तीचा उत्सव

अमरावती महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला. आयुक्त तथा प्रशासक सौम्‍या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सभागृहात “वंदे मातरम्”चा निनाद होत असताना वातावरण देशभक्तीने भारावले.
आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नसून, ते आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरणास्थान आहे.
या गीतातून राष्ट्रनिष्ठा, एकता आणि त्यागाची प्रेरणा मिळते.” या कार्यक्रमाला अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सामूहिक गायनातून देशभक्तीचा संदेश देत, महानगरपालिकेने नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button