amravatinewsIndia NewsLatest NewsMaharashtra

पतंजली इन्टिग्रेटेड महायोग शिबिरात अमरावतीकरांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती शहरात ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजल्यापासून सुरु झालेलं भव्य आणि दिव्य निशुल्क इन्टिग्रेटेड महायोग शिबिर हा एक अनोखा अध्यात्मिक सोहळा ठरला. या शिबिरात पतंजली योगपीठाचे परमशिष्य आणि भारताचे केन्द्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज यांनी उपस्थित साधकांना योगाचे योग्य मार्गदर्शन दिले. अमरावतीतील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी येथे आयोजित या शिबिरात पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. उद्घाटन प्रसंगी मोटिवेशनल स्पीकर शांतिलाल जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकुमार जाजोदिया यांनी केले असून सहआयोजक म्हणून नानकराम नेभनानी यांनी परिश्रम घेतले. या वेळी पतंजलीचे प्रांत संरक्षक राव यशपाल आर्य, भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी दिनेश राठोड, जिल्हा प्रभारी योगेश राठी, किसान पंचायतचे रतिलाल सातपुते, युवा भारतचे अक्षय धानोरकर, राज्यस्तरीय सदस्य सुधीर असतकर आणि जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र महानाग उपस्थित होते. या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व योगशिक्षक, योगशिक्षिका आणि योगसाधकांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसाराचे कार्य केले. अमरावतीकरांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले आहे.
रविवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे भव्य योग महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून,
यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महाउत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button