amravatinewsLatest News
चोरटयांनी गांधी चौकातील बियर शॉपी फोडली

गांधी चौक परिसरातील जैस्वाल यांची बियर शॉपी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडल्याचं प्राथमिक अंदाज आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या दुकानदाराने आपलं दुकान उघडताना शटर उघडं आणि तुटलेलं पाहिलं. त्याने तात्काळ मालक जैस्वाल यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानाची पाहणी केली असता अंदाजे 27 ते 28 हजार रुपये रोकड आणि काही सामान चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. गांधी चौकात रात्री गस्त कमी असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे.



