India NewsLatest NewsMaharashtra

कारागृहातून सुटताच अशपाक खानचा कहर! CCTV मध्ये कैद दहशतीचा खेळ

मरियम नगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या घटनेत, कुख्यात गुन्हेगार अशपाक खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशपाक खान काही दिवसांपूर्वी एमपीडीए अंतर्गत शिक्षा भोगून कारागृहातून सुटला होता. मात्र सुटताच त्याने पुन्हा गुन्हेगारी मार्ग धरला. वाद मिटवण्यासाठी आलेल्या नागरिकांशीही त्याने मारहाण केली, तसेच परिसरात तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. सीताबर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत अशपाक खानला ताब्यात घेतले. परिसरात त्याची दहशत असल्याने पोलिसांनी विशेष पुढाकार घेत आरोपीकडून स्थानिक नागरिकांची माफीही मागायला लावली. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचीही छाननी केली जात आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button