१५० वर्षांनंतरही जिवंत आहे “वंदेमातरम”ची भावना!

राष्ट्रगीत “वंदे मातरम” या अमर गीतास आज १५० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक प्रसंगी उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भव्य समूहगान सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा मधुकर चौधरी तंत्रनिकेतन विद्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला तालुका उपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार शंकर पांचाळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुरवाडे, तसेच BDO आणि BO अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते अक्षय फुलारी यांनी वंदेमातरम गीताच्या इतिहासावर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या रचनाशक्तीवर आणि या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत निर्माण केलेल्या राष्ट्रीय भावनांवर सविस्तर प्रकाश टाकला.
शेकडो विद्यार्थ्यांच्या एकसंध स्वरांनी “वंदे मातरम”चे निनाद उमटला, आणि संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उन्मेषाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.



